जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हजार पाचशेच्या जुन्या नोटा लोकांनी देवाच्या दारी दान केल्या आहेत. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात देणगी आली.
मात्र, देवाच्या दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांनी देवाच्या चरणी चक्क चलनातून बाद झालेल्या जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा अर्पण केल्या आहेत.
या नोटांची मोजंणी केली असता जवळपास एकशे दहा जुन्या नोटा दान पेटित टाकल्या. ज्यांची किंमत एक लाख दहा हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे निश्चलनिकरणापासून देवही वाचला नाही असंच म्हणावं लागेल.