जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
1 मे पासून मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सरकारी गाडीवरची लाल बत्ती गायब झाली होती मात्र काही अधिकारी अजुनही आपल्या गाडीवर लाल दिवा लाऊन रुबाबत फिरत आहेत.
अशाप्रकारे गाडीवर लाल दिवा लाऊन मिरवणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदा शिकवण्याचा पवित्रा कोल्हापुरातील एका सामाजिक संस्थेनं घेतला.
आता लाल दिवा लाऊन फिरणारा अधिकारी दिसल्यावर गुलाब देऊन गांधीगिरी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे डीवायएसपी संजय जाधव यांना गाडीवरचा लाल दिवा काढावा लागला.