निवडणूक प्रचारादरम्यान सापडली लाखोंची रक्कम

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकीसाठी अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी करत आहेत. गाड्यांची तपासणी करत असताना एका गाडीत पाच लाखांची रोकड सापडली आहे. स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी गाडी आणि वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. हे पैसे कशासाठी वापरले जाणार होते, याची माहिती अद्याप समजलेली […]

निवडणूक प्रचारादरम्यान सापडली लाखोंची रक्कम

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकीसाठी अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी करत आहेत. गाड्यांची तपासणी करत असताना एका गाडीत पाच लाखांची रोकड सापडली आहे. स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी गाडी आणि वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. हे पैसे कशासाठी वापरले जाणार होते, याची माहिती अद्याप समजलेली नाही. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघा २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे.

ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे त्या गाडी चालकाकडे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर ही रक्कम वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम वाटण्यात आली आहे का? याचा तपास पोलीस करत असून, ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या दोन्ही ठिकाणी विजयासाठी भाजप आणि मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यात काल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सात तास बैठका घेतल्याने भाजपनं विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना पाच लाखांची रोकड सापडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number