जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकावर पायऱ्यांवर मराठीत काही हास्यापद फलक लावलेत. मात्र, या मराठी फलकांचा मनसेकडून विरोध करण्यात आलाय.
यावेळी रेल्वेने तज्ज्ञाकडून मराठी शिकण्याचा सल्ला मनसेच्या सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलाय.
‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’ मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवरील जिन्यावरील पायऱ्यांवर हे वाक्य पाहायला मिळतं. पण या वाक्याचा नक्की अर्थ काय?ॉ
‘please do not take short cuts’ हे वाक्य तुम्ही गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकलं तर मराठीत ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका….’ असा त्याचा अर्थ दाखवतं. म्हणजेच गुगलनं जसं भाषांतर करुन दिलं. त्याच भाषांतरातील ओळी जशाच्या तशा छापून त्याचे पोस्टर पायऱ्यांवर लावण्यात आले. हा सर्व प्रताप एका सामाजिक संस्थेनं केल्याची कुणकुणही लागली आहे.
मात्र, सध्या हे वाक्य हास्याचा विषय बनला आहे.