Ladki Bahin Yojana: महिलांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी भेट; महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…

महापालिका निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी भेट; महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…

Ladki Bahin Yojana: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा मिळून एकूण 3000 रुपये लाभार्थी महिलांना येत्या 14 जानेवारीपूर्वी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे.

या संदर्भात भाजपच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी ही एक आनंदाची भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी महायुती सरकारने हे पाऊल उचलल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आगामी बीएमसी निवडणुकीत त्या भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विशेषतः महिला मतदारांमध्ये या योजनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनाही या योजनेवर आपला प्रचार केंद्रित करताना दिसत आहे. पुणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या शिवसेनेने ‘लाडकी बहीण’ योजनेला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये महिला संघटकांच्या माध्यमातून थेट लाभार्थी महिलांशी संवाद साधण्याची रणनीती आखण्यात आली आहे. या संवाद कार्यक्रमांमधून सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 119 उमेदवार रिंगणात असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला उमेदवारांचा समावेश आहे. महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार, हे लक्षात घेऊन शिवसेनेने ‘लाडकी बहीण’ योजनेवर विशेष भर दिला आहे. सणासुदीच्या काळात मिळणारा आर्थिक लाभ आणि निवडणुकीतील राजकीय हालचाली यामुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

एकीकडे महिलांना आर्थिक आधार देणारी योजना आणि दुसरीकडे निवडणुकीची रणधुमाळी या दोहोंच्या संगमामुळे ‘लाडकी बहीण’ योजना येत्या काही दिवसांत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number