Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहीणींसाठी खुशखबर! खात्यात जमा झाले इतके पैसे, जाणून घ्या

महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहीणींसाठी खुशखबर! खात्यात जमा झाले इतके पैसे, जाणून घ्या

 राज्यातील लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे.  परंतु फेब्रुवारी महिन्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे आले नव्हते. म्हणजेच लाडक्या बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते. आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहिणींना एकदाच थेट 3000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. परंतु महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत. महिलांना 3000 रुपये मिळतील अशी आशा होती. मात्र ही आशा मावळली आहे. 

त्याचप्रमाणे आज अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये आल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत.

31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसीची मुदत वाढवण्यात आली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number