Ladki Bahin Yojana: सरकारचा ‘अपात्र’ बहिणींवर सर्जिकल स्ट्राईक! 40 लाख महिलांच्या हप्त्यावर संक्रांत? तुमचे नाव तर नाही ना?

मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभार्थी महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana: सरकारचा ‘अपात्र’ बहिणींवर सर्जिकल स्ट्राईक! 40 लाख महिलांच्या हप्त्यावर संक्रांत? तुमचे नाव तर नाही ना?

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेने राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक आधार दिला आहे. मात्र, आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक पात्र महिलेला 'ई-केवायसी' (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली असून, या मुदतीनंतर ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण नसेल, त्यांना योजनेतून कायमचे अपात्र ठरवले जाऊ शकते.

सद्यस्थितीत राज्यातील सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे अद्यापही 30 ते 40 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही, तर जानेवारीपासून त्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होणे बंद होईल. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून, खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने उचललेले हे एक कडक पाऊल आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: BMC जागावाटपाचा 'वर्षा' पॅटर्न; 150 जागांवर एकमत, 77 जागांवरुन संघर्ष; मुंबईच्या राजकारणात आजची दुपार ठरणार निर्णायक

ही प्रक्रिया महिलांना सुलभ व्हावी आणि कोणाचीही धावपळ होऊ नये, यासाठी सरकारने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या सेविका स्वतः महिलांच्या घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करत आहेत. मात्र, तरीही मोठ्या संख्येने महिला या प्रक्रियेपासून लांब असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 31 डिसेंबरनंतर या कामासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी महिलांनी आताच आपली केवायसी पूर्ण करणे हिताचे ठरेल.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांनी त्वरित आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करावी. ही केवळ 1500 रुपयांची रक्कम नसून तुमच्या हक्काचा आर्थिक सन्मान आहे. केवळ एका छोट्या तांत्रिक प्रक्रियेमुळे या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने ई-केवायसी पूर्ण करा. लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2025 ही तुमची शेवटची संधी असू शकते; अन्यथा लाखो बहिणींना या लोकप्रिय योजनेला कायमचा रामराम ठोकवा लागेल.

हेही वाचा: Tigress Airlifted : प्रथमच वाघिणीला एअरलिफ्ट करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा वापर; वाघिणीचे पेंचमधून राजस्थानला स्थलांतर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number