राज्य परिवहन मंडळाच महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन मंडळानं महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील लेडीज स्पेशल लोकलच्या धर्तीवर आता कोल्हापूर ते सांगली अशी लेडीज स्पेशल बस धावणार आहे. कित्येक महिला कामानिमित्त कोल्हापूर ते सांगली आणि सांगली ते कोल्हापूर असा दररोज प्रवास करतात. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईतील […]

राज्य परिवहन मंडळाच महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन मंडळानं महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील लेडीज स्पेशल लोकलच्या धर्तीवर आता कोल्हापूर ते सांगली अशी लेडीज स्पेशल बस धावणार आहे.

कित्येक महिला कामानिमित्त कोल्हापूर ते सांगली आणि सांगली ते कोल्हापूर असा दररोज प्रवास करतात. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईतील लेडीज स्पेशल लोकलप्रमाणे कोल्हापुरातूनही लेडीज स्पेशल बस सुरु करण्यात आली आहे.

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही विभागांनी मिळून ही बससेवा सुरु केली असून याचा फायद बऱ्याच महिलांना होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे.

या लेडीज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून देखील महिला कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळं महिलांना कोणत्याही गैरसोईला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळं या गाडीला चांगला प्रतिसाद मिळतोय.

सकाळी ९.१५ वाजता ही गाडी कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेनं रवाना झाली. त्याच वेळी सांगलीतूनही लेडीज स्पेशल गाडी कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालीय. त्यामुळं कामानिमित्त या दोन्ही शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना फायदा होतोय.

सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही सत्रात गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळं महिलांची गैरसोय टळणार आहे. शिवाय गर्दीचा प्रश्नच उद्भवणार नाही. आणि गर्दी झालीच तर गाडीत सर्वच महिला असणार आहेत. त्यामुळं खेळीमेळीत प्रवास होईल यात शंका नाही.

 

kolhapur-spe.png

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number