निष्ठावंताचा पत्ता कट; भाजपने दिली राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई   भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने आता भाजपमधूनच नाराजीचे  सूर उमटत आहेत. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. माधव भांडारी हे […]

निष्ठावंताचा पत्ता कट; भाजपने दिली राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई

 

भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने आता भाजपमधूनच नाराजीचे  सूर उमटत आहेत. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.

या जागेसाठी भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. माधव भांडारी हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेतच, शिवाय पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि ठोसपणे मांडण्याची मुख्य जबाबदारी ते नेटाने बजावतात.

असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने, प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे कॉग्रेसचे, राष्ट्रवादी, शेकापकडून  उमेदवार असलेले दिलीप माने यांनी राजकारणात काहीही घडू शकते असं सांगितलयं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number