जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान कारण तुम्ही खात असलेली बिर्याणी ही चिकन किंवा मटनची नसून ती कुत्र्याची असू शकते. हे ऐकून धक्का बसेल मात्र हे खर आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कुत्र्यांचे कापलेले शीर सापडत आहे.
बाजारात कुत्ता बिर्याणीची विक्री होत असल्याच धक्कादायक वास्तव समोर आले. केंद्रसरकारच्या अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी हे वास्तव समोर आणले.
गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी नाल्यात किंवा कचऱ्यात कुत्र्याचे कापलेले शीर आढळून येत आहे. मात्र, त्याचे धड आढळून येत नाही. रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त बिर्याणीत कुत्र्याच मांस सर्रास वापरलं जात असल्याने हे प्रकार होत असल्यायचे धक्कादायक वास्तव अधिकाऱ्यांनी समोर आणले.
स्वस्त दरात बिर्याणी विकत असताना असे प्रकार सर्रास होत आहेत. यात कुत्र्यासोबत मांजरीचे देखील मास वापरलं जात असल्याच अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
औरंगाबादेत मुकुंदवाडी, चिखलठाणा आणि पाडेगाव या भागांमध्ये कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून आले. त्यामुळे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी
समितीसमोर हा प्रश्न उपस्थित केला. समितीच्या सदस्यांनी यातील वास्तव सांगितल्यावर आता पालिका रस्त्यावरील सर्व बिर्याणीच्या गाड्यांची तपासणी करणार आहे.
अॅनिमल वेल्फेअर असोशियशनचे सदस्य औरंगाबादेत पाहणीसाठी आले होते. त्यावेळी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केले.
कुठेही बिर्याणी खाताना ती किमान चिकन किंवा मटनची असल्याची शास्वती करून घ्या अन्यथा जीव देखील जाऊ शकतो. यांच्या हा कटू सत्यानंतर आता राज्यातील महानगर पालिका आणि अन्न व औषधी प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहण्यासारख असणार आहे.