जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई विमानतळाच्या जागेवरील झोपडपट्टी काढण्याचे आदेश मुंबई जिल्ह्याधिकारी प्रशासनाकडून देण्यात आले. कुर्ल्यातील संदेश नगर मधील 2400 झोपडीधारकांना
नोटीस देण्यात आल्या आहेत.
मात्र, यात पात्र अपात्र घोळ सुरू स्थानिक नाराज झाले आहेत. मुंबई विमानतळाच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
येथील झोपडपट्टी हटवून त्यांचं पुनर्वसन विद्याविहार मधील कोहिनुर इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, 30 ते 40 वर्ष वास्तव्यास असेलल्या झोपडपट्टीधारकांना
कागदपत्रांच्या अटी पुर्ण न केल्याच्या नावाखाली डावलंल जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या भागात राहणाऱ्या लोकांकडे 2000 सालापासून वीज बिल आहेत, मात्र त्यांच्याकडील हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे घरं मिळवण्यासाठी काय करावं हा
प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.