पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आम्हाला शांतता हवी असल्याचे बोलत असताना दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शुक्रवारी सीमारेषेजवळील भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यासंदर्भात माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरू केले. त्यानंतर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
सध्या भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून पुलावामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लघंन करत आहेत.
पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीतही गोळीबार करण्यात आला होता.
भारतीय जवानांनी यावर पाकिस्तानला चोख प्रयुत्तर दिले.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका होणार आहे.
भारताने पाकिस्तानकडे अभिनंदन यांचे सुरक्षित सुटकेची मागणी केली होती.
गुरुवारी संसदेत बोलताना पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली होती.
त्यामुळे सर्वांचे लक्ष अभिनंदन यांच्या परतण्यावर आहे.