मराठी भाषा दिन अन् कुसुमाग्रजयांच्या निवासस्थानी शांतता, कुसुमाग्रजांचा पडला विसर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आपले लाडके कवी ‘कुसुमाग्रज’ आणि 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा होतो, त्यांच्याच निवासस्थानाकडे सगळ्यांनीच पाठ फिरवली आहे.  कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी सकाळ पासून शांततापसरली आहे. महापौरांनी देखील अभिवादनाची वेळ बदलली. सुरेश भट यांच्या मराठी गीतातील सातवे कडवे, ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या […]

मराठी भाषा दिन अन् कुसुमाग्रजयांच्या निवासस्थानी शांतता, कुसुमाग्रजांचा पडला विसर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपले लाडके कवी ‘कुसुमाग्रज’ आणि 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा होतो, त्यांच्याच निवासस्थानाकडे सगळ्यांनीच पाठ फिरवली आहे. 

कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी सकाळ पासून शांततापसरली आहे. महापौरांनी देखील अभिवादनाची वेळ बदलली. सुरेश भट यांच्या मराठी गीतातील सातवे कडवे, ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरीच हाल सोसते मराठी’, अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमधील कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली. मराठी दिनाच्या खर्या नटसम्राटची ही अनास्थाचं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

मराठीवरून राजकारण करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनीही फिरवली पाठ फिरवली आहे. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ गाजविणारे श्रेष्ठ कथाकार, नाटककार, प्रतिभावंत कवी, कादंबरीकार कुसुमाग्रज यांची महाराष्ट्रात सांस्कृतीक जीवनातील पोकळी कधी भरली जाणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number