कुलभूषण जाधव प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली कुलभूषण जाधव प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ निर्माण झाला आहे. हेराफेरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव आणि कूलभूषण यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये भेट झाली. ही भेट केवळ 40 मिनिटांची होती. कूलभूषण यांच्या आई आणि पत्नीला पाकने भेटी दरम्यान टिकली, मंगळसूत्रे देखील काढण्यास सांगितले होते. तर भेटी दरम्यान एक जाड काचेचा पडदा ठेवण्यात आला होता.  या […]

कुलभूषण जाधव प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कुलभूषण जाधव प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ निर्माण झाला आहे. हेराफेरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव आणि कूलभूषण यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये भेट झाली. ही भेट केवळ 40 मिनिटांची होती. कूलभूषण यांच्या आई आणि पत्नीला पाकने भेटी दरम्यान टिकली, मंगळसूत्रे देखील काढण्यास सांगितले होते. तर भेटी दरम्यान एक जाड काचेचा पडदा ठेवण्यात आला होता.  या भेटीत जाधव यांच्यासोबत एक अधिकारी देखील उपस्थित होते. तर, यावेळी त्यांना मराठीत बोलूही दिले नाही.

 

पाकिस्तानच्या या वागणुकीचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. ‘कुत्र्याचे शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच’ अशा प्रकारची खडतर टीका सामनातून पाकवर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत गदारोळ निर्माण झालाय. पाकने भारतीय संस्कृतीचा अपमान केलाय. अशा प्रकारचा गदारोळ लोकसभेत करण्यात आला. या गदारोळानंतर लोकसभेचे काम तहकूब करण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number