रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणातील पीडितेने आपण भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या दबावामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर तक्रार केली असल्याचा खुलासा पीडितेने केला आहे. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, या प्रकरणातील पीडिता माझ्यावर आरोप केले आत. मी जर तिच्यावर दबाव आणण्यास भाग पाडलं असे तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलत आहे, मला कळत नाही. मात्र, पीडितेने माझ्यावर आरोप केल्यानंतर महिला संरक्षक जागे झाले आहेत. ज्यावेळी पीडितेला मदतीची गरज होती, तेव्हा कोणीही पुढे सरसावले नाही. मात्र, मी मदतीचा हात पुढ केला. विद्या चव्हाण यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तसेय याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाले आहेत.
चित्रा वाघ यांनी पीडितेशी झालेले संभाषणही वाचून दाखवले आहेत. त्या म्हणाल्या, पीडिता एकटी लढत असताना मी तिच्यासोबत उभी राहिली आहे. मी तिला मदतच केली आहे. मात्र, पीडिता माझ्यावर आरोप का करतेय हे खरंच कळत नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. त्यामुळे मी दबाव आणला असेल तर मी चौकशी करण्यासाठी तयार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ‘रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले… खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही, असेही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हते. मात्र, आज माझ्या विरोधात सगळे एकत्र याच आनंद वाटला. याप्रकरणी मी सर्व चौकशींसाठी तयार आहे.’
रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात
Feb पासून एकटी लढणार्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला..
मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे pic.twitter.com/wtHn1s3bz9 — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 12, 2022