आरोपी कृष्णा आंधळेच्या संपत्तीबाबत न्यायालयाने दिला आदेश

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सातत्याने चर्चेत आहे.

आरोपी कृष्णा आंधळेच्या संपत्तीबाबत न्यायालयाने दिला आदेश

बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राज्यात संतप्त पडसाद उमटले. देशमुखांचा खून करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चेही काढण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आले. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. देशमुखांच्या हत्येला जवळपास ६५ दिवस उलटूनही आंधळे फरार आहे. या प्रकरणात आता कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. कोर्टाकडून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता कृष्णा आंधळेंवर पोलिस कारवाई करणार आहेत. 

हेही वाचा : दिल्ली स्थानकातील चेंगराचेंगरीवर नेतेमंडळींची प्रतिक्रिया

संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर २०२४ रोजी होऊन झाला होता तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती यामध्ये कृष्ण आंधळे यांच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत.. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number