क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे महागड्या वस्तू वापरत असून त्यांच्या वस्तूंची किंमत कोटींच्या घरात असल्याचा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. यावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
क्रांती रेडकर म्हणाल्या, समीरची सर्व मालमत्ता त्याच्या आईने जिवंतपणी कमावली आहे. आणि ती मालमत्ता निश्चितच ५० ते १०० करोड किमतींची आहे. वयाच्या १५व्या वर्षापासून त्याच्या आईची मालमत्ता समीरच्या मालकीची आहे. तसेच सर्व कागदपत्रे सरकारी कर्माचाऱ्यांच्या नियमांनुसार प्रत्येक वर्षी सरकारला सादर करतात. ते बेनामी नाहीत. सावन के अंधे को हरयाली दिखती है. असे, ट्विट करत क्रांती रेडकर यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच समीर वानखेडे यांनीसुद्धा मलिकांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी महागडे कपडे वापरतो ही केवळ अफवा आहे. नवाब मलिकांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावे आणि तिथले कपड्यांचे दर माहिती करून घ्यावे. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी,’ असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.