पावसाने ओढ दिल्यामुळे काही दिवसापासून ओस पडत चाललेल्या कृष्णा नदीच्या पात्रात अखेर कोयनेचे पाणी पोहोचले. त्यामुळे सांगलीकर जनतेला भेडसावणारे पाणी टंचाईचे संकट टळले आहे. काही दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने आणि कोयनेतील चिंताजनक पाणी साठा यामुळे नदीत पाणी सोडले जात नव्हते. यामुळे सांगलीच्या जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीतील लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा कोयना धरण प्रशासनाशी समन्वय साधून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे रविवारी कोयनेतून पाणी सोडण्यात आल्याने ओस पडत चाललेली कृष्णा नदी पाणी आल्याने पुन्हा प्रवाहित झाली.