चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक – महेश कोठारे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
डॅम इट म्हणत कधी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे तर कधी प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे, महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरेच काही’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा बुधवार, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह (दादर) येथे पार पडला.
हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करताना कोठारे यांनी ‘हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनातील चढ- उतारांचा पूर्ण प्रवास आहे, ज्यांना मराठी चित्रपट क्षेत्रात यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल’, असं म्हटलं.
चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.