जय माहाराष्ट्र न्यूज, पुणे
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मिळालाय. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळालाय. पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय.
कोरेगाव-भीमाजवळ 1 जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला.
याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आणि 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याआधीच त्यांना आज सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.