कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी, मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक

जय महाराष्ट्र, पुणे कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना आज अखेर अटक झाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी घरी जाऊन त्यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.  कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर, दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर […]

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी, मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक

जय महाराष्ट्र, पुणे

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना आज अखेर अटक झाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी घरी जाऊन त्यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 

कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर, दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून चौकशीदरम्यान जाणीवपूर्वक चुकीची आणि अर्धवट माहिती देत आहेत. या मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व अर्ज फेटाळला

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number