जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोपर्डी बलात्कार आणि हत्ये प्रकरणी बचाव पक्षाच्या साक्षीदारांसाठी आरोपी संतोष भवाळनं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
या खटल्यात सरकारची बाजू मांडत असलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह इतर पाच जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली.
आरोपीची ही याचिका जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. त्यानंतर आता आरोपीनं आता सर्वोच्च न्यायालयानंही याचिका फेटाळली आहे.