जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना अखेर आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीनही नराधमांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. अखेर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी बचावपक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. तर, दोषींना फाशीच द्यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती.