जय महाराष्ट्र न्यूज, नगर
वर्ष झालं. पण विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. तेरा जुलैच्या त्या काळरात्री कोपर्डीच्या निर्भयावर ते हैवान लांडगे तुटून पडले. निरागस शरीराचे लचके तोडत त्यांनी अमानुष अत्याचार केले.
वेदनांनी कासाविस होऊन ती निरागस कळी उमलतानाच कोमेजली, संपली. पण आजही कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालेला नाही. निर्भयाचे आई वडिल आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
निर्भयाच्या मृत्यूनंतर लाव्हा उसळला. मराठा क्रांती मोर्चाच्या रुपानं लाखोंचे मोर्चे निघाले. पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. वर्षभरानंतर आजही राज्यात अनेक मोर्चांचं आयोजन करण्यात आलं.