माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या नराधमांच्या अंगावर पिसाळलेले कुत्रे सोडून त्यांना फाशीच द्या; कोपर्डीच्या निर्भयाच्या आईची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर सगळ्यांनीच माझ्या छकुलीला साथ दिली; आता भरचौकात नरधमांच्या अंगावर कुत्रे सोडून त्यांना फाशीच द्या अशी मागणी कोपर्डीतील निर्भयाच्या आईने केली आहे.  न्यायालयातील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले. आमची बायको, आई, मुलं आमच्यावर अवलंबून आहेत, असं हे मारेकरी न्यायालयात सांगत आहेत. माझ्या छकुलीला आई नव्हती का? वडिल […]

माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या नराधमांच्या अंगावर पिसाळलेले कुत्रे सोडून त्यांना फाशीच द्या; कोपर्डीच्या निर्भयाच्या आईची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

सगळ्यांनीच माझ्या छकुलीला साथ दिली; आता भरचौकात नरधमांच्या अंगावर कुत्रे सोडून त्यांना फाशीच द्या अशी मागणी कोपर्डीतील निर्भयाच्या आईने केली आहे. 

न्यायालयातील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले.

आमची बायको, आई, मुलं आमच्यावर अवलंबून आहेत, असं हे मारेकरी न्यायालयात सांगत आहेत. माझ्या छकुलीला आई नव्हती का? वडिल नव्हते का? त्यांना हे का दिसलं नाही?, असा सवाल विचारताना निर्भयाची आई एकदम भावूक झाली.

नराधमांनी माझ्या छकुलीचा गळा आवळून तीचा जीव घेतला. त्यांचा देखील गळा आवळा. माझ्या छकुलीचे लचके तोडले. त्यांच्या अंगावल देखील पिसाळलेले कुत्रे सोडा. समाजापुढे या सगळ्यांना जाहीर फाशी व्हायला हवी. म्हणजे लहान लहान मुलींवर अशाप्रकारचं कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number