जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरू झालंय. दोन दोषींच्या शिक्षेवर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला.
दोषींच्या वकिलांनी आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलीये. याप्रकरणी तिसऱ्या दोषीच्या शिक्षेबाबत आणि सरकारी वकिलांचा बुधवारी युक्तिवाद होणार आहे.
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषी आहेत. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा निकाल आता बुधवारी लागण्याची शक्यता आहे.