Konkan Voter List Verification: मतदार यादीतून नाव वगळलं जाणार? कोकणातील चाकरमान्यांना ग्रामपंचायतींचे थेट कॉल; तातडीने करा ‘हे’ काम!

मतदार यादीतील नाव कायम राहावे यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने चाकरमान्यांची धावपळ वाढली आहे.

Konkan Voter List Verification: मतदार यादीतून नाव वगळलं जाणार? कोकणातील चाकरमान्यांना ग्रामपंचायतींचे थेट कॉल; तातडीने करा ‘हे’ काम!

राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआरआर) अभियानाचा मोठा परिणाम कोकणातील चाकरमान्यांवर दिसून येत आहे. रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई-विरार आणि इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या हजारो कोकणवासीयांना सध्या गावाशी सतत संपर्क ठेवावा लागत आहे. मतदार यादीतील नाव कायम राहावे यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने चाकरमान्यांची धावपळ वाढली आहे.

गावातील नातेवाईक, ग्रामपंचायत प्रतिनिधी, बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ), ग्रामसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते दूरध्वनीद्वारे मतदारांशी संपर्क साधत आहेत. आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करण्याबाबत सूचना देत त्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. परिणामी, शहरात नोकरी सांभाळत कागदपत्रे गोळा करणे, अर्ज भरून गावाकडे पाठवणे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, या सर्व गोष्टींसाठी चाकरमान्यांना अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे.

हेही वाचा – Landslide at Harishchandragad: हरिश्चंद्रगडावर निसर्गाचा कोप; ट्रेकर्सवर कोसळली दरड, लोखंडी रेलिंगमुळे 4 जण… 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये मतदारांची स्वतंत्र गावनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधून त्यांना आवश्यक माहिती देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मतदार नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पाडली जात आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरांतील विविध ग्रामस्थ मंडळांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. कार्यालयीन वेळेनंतर मंडळांचे पदाधिकारी चाकरमान्यांना एकत्रित बोलावून अर्ज भरण्यास मदत करणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, शंकांचे निरसन करणे आणि गावातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, अशी जबाबदारी पार पाडत आहेत.

या सामूहिक प्रयत्नांमुळे अनेक चाकरमान्यांसाठी मतदार पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी झाली असून, गावाशी असलेला त्यांचा संवाद आणि नाळ पुन्हा एकदा अधिक घट्ट झाल्याचे चित्र सध्या कोकणभर पाहायला मिळत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number