जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
निलंबित डीवायएसपीच्या मुलीने घरकामासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलावर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलगी आणि निलंबित डीवायएसपी कुटुंबियांसह फरार झालेत. पोलीस हे प्रकरण दडपण्याचा आणि आरोपी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आऱोप पीडिताच्या कुटूंबीयांकडून करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरातील कनाननगरचा परिसरात पीडित मुलाचे झोपडीवजा घर आहे. मुलाची आई घरातली काम करुन घर चालवतात. पीडित मुलगा ही जेमतेम 12 वर्षांचा आहे. त्याला कोल्हापूरमधल्या मधुकर शिंदे या पोलीस अधिकाऱ्यानं दत्तक घेतो असं सांगितलं होतं. आईनेही घरातील दारिद्र्य पाहून त्याला अधिकाऱ्य़ाच्या घरात पाठवायचा होकार दिला. पण तिथ जे घडलं ते वेगळंच. पोलीस अधिकाऱ्याच्या घरात लहान मुलाचा प्रचंड छळ केला जात होता. अधिकाऱ्याच्या मुलीनंही या मुलाचं लैंगिक शोषण करायला सुरूवात केली होती. कोल्हापूर शहरातल्या ताराबाई पार्क परिसरातील इमारतीत हा पोलीस अधिकारी आपल्या कुटूंबीय रहात होता. पण गेल्या 2 दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यानं त्याच्या कुटुंबीयासह राहत्या घरातून पळ काढला. या अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता पिडित मुलाच्या आईनं केलीय.
विशेष म्हणजे या प्रकारानंतर ज्यावेळी पिडित मुलाला वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणलं गेलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या कॅमेरांना चुकवण्यासाठी पोलिसांनी याच पिडित मुलाला अक्षऱशः फरफटत नेलं गेल होतं आणि गाडीत कोंबल गेलं होत. पोलिस अधिकारी असं कस करू शकतात? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थीत करत या प्रकाराची एसआयटीमार्फथ चौकशी करावी अशी मागणी केलीय.
पिडित मुलाच्या वैद्यकिय चाचणीबाबत रुग्णालय प्रशासन सतर्क दाखवत आहे. परंतू योग्य अहवाल न्यायालयात पाठवला जाईल असं रुग्णालय म्हणतंय. तर फरार पोलिस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी पोलीसांची 2 पथकं रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तब्बल 6 वर्ष पिडित मुलानं सगळा त्रास सहन केलाय. आता त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची गरज आहे. कारण रक्षकच भक्षक बनत असेल तर या प्रवृ्ततींना वेळीच ठेचायला हवं हे नक्की.