मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

वडीलधाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

कोल्हापूर : वडीलधाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ केला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीर्थदर्शन योजनेच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. 

‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. भारतातील ७३ आणि आपल्या राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ प्रवाशांच्या सोयीसाठी योजनेतील रेल्वेत वैद्यकीय सुविधा तसेच औषधांचीही व्यवस्था आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे तीर्थदर्शन यात्रेत सहभागी झालेल्यांना शुभेच्छा दिल्या. तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी, आई अंबाबाईच्या करवीर येथून होतो आहे, याचा मनापासून आनंद होत आहे.  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे आयोध्येसाठी रवाना होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर साकारलयं. प्रभू रामांचं दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचं अभिनंदन असं मुख्यमंत्री म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number