राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींनी अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली.

राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींनी अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती आणि कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू आणि भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number