जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूर शहरातल्या रेल्वे फाटक परिसरात भाजी मंडई आहे. तिथं भाजी विक्रेत्यांना गुंडांकडून त्रास होतो, पाकिटमारांचाही तिथ सुळसुळाट आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत कोल्हापूरमध्ये बुधवारी भाजीविक्रेत्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आत्मदहन करण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला. यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. तर अनेक महिला या रॉकेलची कॅन घेऊन आत्मदहन करण्याच्या तयारीत होत्या. पण पोलिसांनी हे कॅन्स हिसकावून घेतले. आणि सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्य़ात घेतले. पण आता या आंदोलनानंतर तरी पोलीस आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का हे पहावं लागणार आहे.