Homeमहाराष्ट्र यशस्वी लढा देऊन हटवलेला ‘तो’ टोल नाका पून्हा सुरु होणार
यशस्वी लढा देऊन हटवलेला ‘तो’ टोल नाका पून्हा सुरु होणार
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर कोल्हापूरकरांनी यशस्वी लढा देऊन हटवलेला शहरांतर्गत टोल पुन्हा एकदा सुरु होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारने पैसे भागवण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याने, आयआरबी कंपनीने पुन्हा टोल सुरु करण्याचा इशारा दिलाय. त्याबाबतचं पत्र आयआरबीने कोल्हापूर महापालिकेला लिहिलंय. महिनाभरात पैसे दिले नाहीत, तर पुन्हा टोल वसूल करु, असं या पत्रात म्हटलंय.