कोल्हापुरात राधानगरीचा खेळोत्सव

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा म्हटलं की, पहिलं नाव ओठांवर येतं ते राजर्षी शाहू महाराज यांचं. कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेला राधानगरी तलाव शाहू महाराजांनी उभारला होता. याच राधानगरीत दरवर्षी चैत्र महिन्यात खेळोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातून देवांची उपासना करण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या […]

कोल्हापुरात राधानगरीचा खेळोत्सव

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा म्हटलं की, पहिलं नाव ओठांवर येतं ते राजर्षी शाहू महाराज यांचं. कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेला राधानगरी तलाव शाहू महाराजांनी उभारला होता. याच राधानगरीत दरवर्षी चैत्र महिन्यात खेळोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातून देवांची उपासना करण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते.

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात सर्व समाज एकत्र यावा म्हणून राजर्षी शाहूंनी सुरू केलेला लोकोत्सव आजही राधानगरीकर तेवढाच पारंपरिक बाज ठेवून आत्मयितेने साजरा करतात. प्रत्येक पर्यंटकाने एकदा तरी अनुभवावा असा हा खेलोत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number