Homeमहाराष्ट्र अंबाबाई मंदिरात ‘तोकड्या कपड्यात’ प्रवेशबंदीचा निर्णय मागे
अंबाबाई मंदिरात ‘तोकड्या कपड्यात’ प्रवेशबंदीचा निर्णय मागे
अंबाबाई मंदिरात ड्रेस कोडची सक्ती केली जाणार नसल्याचं देवस्थान समितीने आता स्पष्ट केलं आहे. देवस्थान समितीने हा निर्णय घेतल्यानंतर यावरचा वाद चांगलाच पेटला होता, त्यानंतर देवस्थान समितीने आता हा निर्णय मागे घेतला आहे. या विषयावर चर्चा करण्याची तयारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ठेवली असून हा वाद इथेच थांबवा असे आवाहनही त्यांनी केलं आहे