जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
ऊस दराच्या प्रश्नावरून शिवसेनेने आज साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा काढला. ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार ,कारखानदार, आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात निघालेल्या तोडग्यात एफ आर पी सह पाचशे रुपये अधिक देण्याचे ठरले होते.
मात्र, कारखाने फक्त एफ आर पी वर शेतकऱ्यांची बोळवण करत असल्याने शिवसेनेने मोर्चा काढून मशालीसह निवेदन दिले.
ठरलेला दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेने दिलाय.