जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांकडून सदाभाऊ खोत यांचा निषेध केला जात आहे. त्यातच सदाभाऊ खोतांनी ज्या कोथळी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
त्याच कोथळी गावातील शेतकऱ्यांनी सदाभाऊ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. तसेच यावेळी आंदोलकांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आपला रागही व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोवर आंदोलनं सुरुच ठेवून, ते आणखी तीव्र करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.