जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापुरात आज रंगमपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांनी देखील कोरडी रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला. कोल्हापूरच्या या रंगपंचमीचं विशेष म्हणजे पाण्याचा वापर आणि नासाडी टाळत नागरिकांनी कोरड्या रंगाने हि रंगपंचमी खेळत राज्यातील जनतेला एक संदेश दिलाय.
कोरड्या रंगाच्या विविध रंगात आज संपूर्ण तरुणाई जल्लोष करत होती. तर काहींनी डीजेच्या तालावर डान्स देखील केला. रंगपंचमी दरम्यान कोल्हापूर शहर आणि पूर्ण जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.