जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
सुमारे 140 वर्षे वाहतुकीचा भार पेलणारा आणि कोल्हापूर-कोकणाला जोडणारा पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल हा कमकुवत झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल उपलब्ध झालाय. 26 जानेवारीला झालेल्या भीषण अपघातानंतर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.
ऑडिटमध्ये जुन्या पुलावरुन अवजड वाहतूक पूर्णत: बंद करावी आणि हलक्या वाहनांच्या वेगावर मर्यादा घालावी, असे म्हटले आहे. पुलाच्या आयुर्मानाकडे दुर्लक्ष करुन अवजड वाहनांची वाहतूक झाली तर कोणत्याही क्षणी पूल कोसळू शकतो, असेही अहवालात म्हटले आहे.