कोल्हापूरचा विनोद मकणापुरे अर्थात कोल्हापूरचा ओबामा उर्फ ‘कमलेश’ या 14 वर्षीय मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
विकलांग असलेल्या या मुलाचा व्हिडीओ करून तो सोशल मीडियावर कोणीही पोस्ट करत आहे, एवढंच नव्हे तर त्याला दारू गांजा पाजून त्याची मज्जाही लुटली जात आहे.
हा प्रकार लक्षात घेता यानिमित्ताने कोल्हापूरकरांची विकृत मानसिकताच समोर आली आहे.
कोल्हापुरातील हा 14 वर्षीय विनोद मकणापुरे एका रात्रीत फेमस झाला आहे.
काय आहे हा प्रकार?
- एका पट्याने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि विनोद एका क्लिकमध्ये जगासमोर आला.
- कोल्हापूरचा हा 14 वर्षीय विनोद ओबामा सारखा दिसायला आहे, मग एकाने त्याला कोल्हापूरचा ओबामाच करून टाकला आणि जगात भारी कोल्हापुरी मध्ये सगळे जगचं समावल्याचा भास सर्वांना झाला.
- या छोट्या ओबामांची ख्याती इतकी पसरली की गल्लीत तो एकटा दिसला की अवकाश त्याला उचलून नेलाच म्हणून समजायचं.
- मग त्याला कोणी कॉलेजात तर कोणी रंकाळ्यावर घेऊन जात आणि त्याचे मनसोक्त व्हिडिओ काढत.
- बघता बघता या ओबामांचा कमलेश झाला आणि कुणी त्याचेही गाणे काढून पोस्ट केले.
- ‘कमलेश बस की बस’ या गाण्यावर त्याला नाचायला सुद्धा लावले.
- कामलेशला मिळणाऱ्या हिट्सच्या उंचीचा आलेख वाढत असल्याने कामलेशच्या घरातले सुद्धा खुश झाले.
- गवंडी काम करणाऱ्या वडिलांना मुलाचा एकटेपणा सुटला असे वाटले त्यामुळे तेही निश्चिन्त झाले.
- मात्र एके दिवशी विनोदच्या तोंडाला दारूचा वास आला आणि ते हादरून गेले, विनोदच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याचे व्हिडिओ बनवले जात होते तिथपर्यंत हे प्रकरण ठीक होते.
- मात्र विकलांग असलेल्या विनोदचा गैरफायदा घेऊन त्याला दारू,गांजा दिला जाऊ लागला आहे, त्याच्या नावावर पैसे सुद्धा उखळले जाऊ लागले आहेत.
विनोद विकलांग असला तरी माणसातल्या या विकृतपणामुळे विनोदचे व्हिडीओही त्याची खिल्ली उडवण्यासाठी आणि त्याचाच विनोद करण्यासाठी केले जात होते
हे आता स्पष्ट होऊ लागले त्यामुळे विनोदच्या वडिलांनी थेट पोलिसांशी संपर्क करत हे सगळे रोखण्याची मागणी केली.
विनोदसोबत सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल कोल्हापूरकरांच्या सुज्ञ नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.