कोल्हापुरात आता ‘डिजिटल दवंडी’

कोल्हापुरात आता डिजिटल दवंडी ऐकायला मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये पब्लिक अड्रेस सिस्टीम या नव्या उपक्रमाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमांतर्गत एकाच वेळी ६५० गावात संदेश पोहचवण्यात येणार आहे. हा उपक्रमासाठी पूर्णत: वायरलेस पद्धत वापरण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागात यासाठी सौर पॅनल वर चालणारी उपकरणे बसवण्यात आली आहेत. महापूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात […]

कोल्हापुरात आता ‘डिजिटल दवंडी’

कोल्हापुरात आता डिजिटल दवंडी ऐकायला मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये पब्लिक अड्रेस सिस्टीम या नव्या उपक्रमाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमांतर्गत एकाच वेळी ६५० गावात संदेश पोहचवण्यात येणार आहे. हा उपक्रमासाठी पूर्णत: वायरलेस पद्धत वापरण्यात आली आहे.

शहरात आणि ग्रामीण भागात यासाठी सौर पॅनल वर चालणारी उपकरणे बसवण्यात आली आहेत. महापूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोलमडणाऱ्या मोबाईल यंत्रणेमुळे नेमकी माहिती लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यावेळी आप्तकालीन स्थितीत ही वायरलेस यंत्रणा उपयुक्त ठरणारी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून या यंत्रणेवर मोबाईल फोनद्वारे संदेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील लोकांना जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी या डिजीटल दवंडीद्वारे थेट संदेश साधणार आहेत. देशात पहिल्यांदाच अशी यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यात बसवण्यात आली असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number