कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीला सुरूवात

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट-निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी संपला असून आजपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. निवडणुकीसाठी मविआकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजीत कदम हे रिंगणात असून आता जनतेचा कौल कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी सकाळी १० वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले आहे. […]

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीला सुरूवात

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट-निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी संपला असून आजपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. निवडणुकीसाठी मविआकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजीत कदम हे रिंगणात असून आता जनतेचा कौल कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी सकाळी १० वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला. जयश्री जाधव यांनी आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर पालकमंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number