जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
महाराष्ट्र ,कर्नाटक आणि गोवा राज्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. बुधवारी या प्रश्नावरून उत्तर कर्नाटकात कडकडीत बंद पाळण्यात येत असून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाचा फटका सिमाभागाला बसला. त्यामुळे कर्नाटकमध्ये जाणारी बसवाहतूक ठप्प झालीय.
उत्तर कर्नाटकाने या पाण्यावर आपला हक्क सांगत मलप्रभा नदीत यापैकी काही पाणी वळवण्याची मागणी केलीय. मात्र, गोवा सरकारने याला प्रतिसाद दिलेला नाही. या प्रश्नावर नेमलेल्या लवादानेही कर्नाटकला पाणी देण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे दिल्लीत याबाबत काल भाजपच्या वरिष्ठांनी बैठक घेतली. मात्र, पर्रीकर सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही.