जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या वादाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि याच्या चौकशीची मागणी केली.
मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली. त्यावेळी पुजारी नेमण्यासाठी 3 महिन्यांत कायदा करणार, अशी घोषणा विधी आणि न्यायमंत्री रणजीत पाटील
यांनी केली.