Kolhapur Jyotiba Temple : ज्योतिबा मंदिरातील मारहाण प्रकरण पेटलं; मारहाणीच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद

काल कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून परीते गावातील काही भाविकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Kolhapur Jyotiba Temple : ज्योतिबा मंदिरातील मारहाण प्रकरण पेटलं; मारहाणीच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद

काल कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून परीते गावातील काही भाविकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. परीते गावातील दोन भाविका कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन भाविकांनी जोतिबा डोंगरावर मद्य प्राशन करून मंदिराचा आवारात प्रवेश केला. त्याचबरोबर भक्तांना आणि पुजाऱ्यांना आर्वाच्य शिवीगाळ केल्याबद्दल दोघा भक्तांना 15 ते 20 पुजाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांसह तुंबळ मारहाण केल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यात आले.

हेही वाचा- Sanjay Raut: ‘खरात बाबांकडे तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री जात होते?’; संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल

त्यानंतर ज्योतिबा मंदिराची नाहक बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर आणि ज्या भक्तांनी दंगा केला त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज ज्योतिबा मंदिर त्याचबरोबर जोतिबा गाव बंद करून या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरील दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. दरम्यान मद्यप्राशन केलेल्या दोन व्यक्तींनी मद्यप्राशन करून हुलडबाजी केलीच त्याचसोबत देव कार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात 15 पुजारी आणि 15 भाविकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कालच्या या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number