कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी, महिलांना 50 टक्के आरक्षण

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक बुधवारी मंजूर झाल्यामुळे पुढे मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यात 50 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधान परिषदेची मंजुरी व राज्यपालांची स्वाक्षरी या पायऱ्या पार केल्यानंतर या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होईल. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही […]

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी, महिलांना 50 टक्के आरक्षण

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक बुधवारी मंजूर झाल्यामुळे पुढे मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यात 50 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधान परिषदेची मंजुरी व राज्यपालांची स्वाक्षरी या पायऱ्या पार केल्यानंतर या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होईल.

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही माहिती दिली. यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी एका लखोट्यात पुजाऱ्यांना किती हक्क द्यावेत, याचा उल्लेख केला होता. त्याप्रमाणे हक्क देताना त्यांचे प्रमाण ठरवले जाईल. पंढरपूरप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल.

या विधेयकानुसार सध्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येणार असून राज्यस्तरीय परीक्षा घेऊन मंदिरातील पुजाऱ्यांची नेमणूक होईल. त्यात 50 टक्के महिलांना स्थान असेल. तसेच, मंदिर व्यवस्थापनाकडून कोल्हापूर येथील शाहू वैदिक विद्यालयाला साहाय्य करण्यात येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number