जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही, असं म्हणायची वेळ कोल्हापुरात घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे आलीय. शाहूवाडी तालुक्यात शिवारे गावातील संत बाळूमामा मंदिरात चोरीची घटना घडलीय.
चोरट्यांनी मंदिरातील सोने चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीवर डल्ला मारलाय. मात्र, ही चोरी मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्हीत कैद झालीय.
आपण पाहू शकतो सीसीटीव्ही दृश्यात 2 चोरटे मूर्तीवरचे दागिने, त्याचबरोबर मूर्तीसमोर भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तू चोरून नेताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, चोरट्यांनी संत बाळूमामा मंदिराच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिरातली दानपेटीही चोरून नेली आहे.
ही दानपेटी चोरट्यांनी शेजारच्या शेतात नेऊन फोडल्याचं तपासात समोर आलंय…त्यानंतर पोलीस घटनेचा कसून तपास सुरू केलाय.