कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.   कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे. आरोपींना सामील होऊन पुरावे नष्ट करण्यात आल्याने तसेच तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे पुरावे हाती लागल्याने सिन्हा अडचणीत आले […]

कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे. आरोपींना सामील होऊन पुरावे नष्ट करण्यात आल्याने तसेच तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे पुरावे हाती लागल्याने सिन्हा अडचणीत आले आहेत.

 

सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांपूर्वी सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पॅनल स्थापन करण्यात आले होते.

 

या चौकशीनंतर रणजीत सिन्हा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. 2012 ते 2014 दरम्यान सीबीआयचे संचालक होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number