जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 11 वाजता नाणारला भेट देणार आहेत. याठिकाणी त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. सागवे येथील नामदेव नकाते यांच्या निवासस्थानी पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधी समिती आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा देणाऱ्या जनहक्क समितीच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक होणार आहे.
या सभेत उद्धव ठाकरे महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली. नाणार आंदोलनात फूट पाडण्यासाठीच ग्रामस्थांचा बहिष्कार, अशा बातम्या विरोधकांनी पेरल्या असा आरोपदेखील राऊत यांनी केलाय.