बोरिवलीतून गणेशोत्सवाची कोकणरेल्वे

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे.

बोरिवलीतून गणेशोत्सवाची कोकणरेल्वे

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे.  या काळात रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळणे खूप कठिण असते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. आठवड्यातून दोन वेळा म्हणजेच मंगळवार आणि गुरूवार ही एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे गुरूवारी २९ ऑगस्टला बोरीवली रेल्वे स्थानकातून पहिली ट्रेन धावली.  यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पीयूष गोयल, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती दर्शवली. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number