जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
ख्रिस्टमस आणि थर्टीफस्ट म्हटले की लोकांचे विविध प्लॅन ठरलेलेचं असतात. त्यात फिरायला जाणं याला नागरिकांची पहिली पसंती असते. आणि म्हणूनच सध्या पर्यटकांनी पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती दर्शवलेली दिसतेय. कोकणातील सर्वचं किनारपट्ट्या गर्दीनं हाऊसफुल झाल्यात. आणि त्यातच सावंतवाडीतील पर्यटन महोत्सव या पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरलीय.
या पर्यटन महोत्सवाची ही 16 वर्षांची परंपरा आहे. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा एकमेव पर्यटन महोत्सव आहे की जो रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढत चालली आहे.